शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव: पालिकेच्या शाळेत शिक्षिकेची विद्यार्थिनीस मारहाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:49 IST

खामगाव: शहरातील एका पालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनीस मारहाण करण्यात आली. गालावर आणि कानावर जखम झाल्याने पोलिसांनी विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणीही केली. त्यानुसार तक्रार दाखल केली जात असतानाच, पालकांनी वेळीच पोलीस तक्रारीस नकार दिला. त्यामुळे पालकांकडून लेखी घेत पोलिसांनी प्रकरण मिटविले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शहरातील एका पालिकेच्या शाळेतील विद्यार्थिनीस मारहाण करण्यात आली. गालावर आणि कानावर जखम झाल्याने पोलिसांनी विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणीही केली. त्यानुसार तक्रार दाखल केली जात असतानाच, पालकांनी वेळीच पोलीस तक्रारीस नकार दिला. त्यामुळे पालकांकडून लेखी घेत पोलिसांनी प्रकरण मिटविले.

शहरातील पालिकेच्या एका शाळेत दुपारी एका शालेय विद्यार्थिनीस खरोटे नामक शिक्षिकेने मारहाण केली. शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थिनी जखमी झाली असून, तिच्या कानावर तसेच गालावर जखम झाली. विद्यार्थिनीने घडलेला प्रकार घरी सांगितला. त्यानंतर सायंकाळी सदर विद्यार्थिनी आपल्या आई-वडिलांसह शहर पोलीस स्टेशनला दाखल झाली. तक्रार देण्यापूर्वी विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच, पालकांनी पोलीस तक्रार देण्यास नकार दिला. त्यामुळे शहर पोलिसांनी पालकांकडून लेखी लिहून घेत, प्रकरण मिटविले.  तथापि, याच शिक्षिकेविरोधात यापूर्वीही काही पालकांच्या तक्रारी असल्याची चर्चा पोलीस स्टेशनमध्ये होती. दरम्यान, सोमवारी घडलेले विद्यार्थिनी मारहाण प्रकरण सामोपचाराने मिटविण्यासाठी पालिकेतील एका शिक्षक नेत्यासह प्रशासन अधिकाºयांची शिष्टाई कामी आली. तक्रार दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी पालकांनी नकार दिल्याने, पोलिसांनी या प्रकरणातून काढता पाय घेतला. सोबतच याप्रकरणी तक्रार न देण्यासाठी पालकांवर राजकीय दबाव आणण्यात आल्याचीही चर्चा पोलीस वर्तुळात होती. दरम्यान, यासंदर्भात पालिकेचे प्रशासन अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा मोबाइल फोन नॉट रिचेबल आला. 

टॅग्स :khamgaonखामगावSchoolशाळाStudentविद्यार्थी