‘तलाव तिथे कमळ’ फुलविण्यासाठी शिक्षकाची धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 10:54 AM2021-06-19T10:54:33+5:302021-06-19T10:54:52+5:30

Khamgaon News : ‘तलाव तिथे कमळ’ या उपक्रमाच्या माध्यमातून खामगाव तालुक्यातील सर्वच तलावात विविध जातींची कमळ फूल पोहोचविली आहेत.

Teacher's struggle to blossom lotus everywhere | ‘तलाव तिथे कमळ’ फुलविण्यासाठी शिक्षकाची धडपड!

‘तलाव तिथे कमळ’ फुलविण्यासाठी शिक्षकाची धडपड!

googlenewsNext

- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: मन मोहित करणारे आणि  ‘राष्ट्रीय फूल’ म्हणून नावलौकीक असलेले कमळ फूल काहीसे दुर्लक्षीत असेच आहे. मात्र,  खामगावातील एका ध्येयवेड्या शिक्षकाने कमळाला आपलेसे असून, स्वत:च्या टेरेसवर कमळाची आलिशान बाग फुलवली. इतकेच नव्हे तर परिसरातील ‘तलाव तिथे कमळ’ या उपक्रमाच्या माध्यमातून खामगाव तालुक्यातील सर्वच तलावात विविध जातींची कमळ फूल पोहोचविली आहेत.

जिद्द...चिकाटी आणि परिश्रमाच्या त्रिसुत्रीतून ध्येयवेड्या शिक्षकाचा उपक्रम आता नजीकच्या अकोला, वाशिम आणि जळगाव जिल्ह्यात पोहोचला आहे. त्यामुळेच पर्यावरण रक्षक आणि पक्षीमित्र असलेल्या या शिक्षकाची  हौस आणि छंदाला निसर्गनिर्मितीने फुलवणारा अवलिया म्हणजे संजय गुरव अशी नवी ओळख सर्वदूर तयार होत आहे. एका कमळाच्या कंदापासून त्यांनी आपल्या घरावरील कमळ बागच फुलविली. नव्हे तर, परिसरातील तलावातही कमळ कंदाचे रोपण केले. गुरव यांच्या तलाव तिथं या उपक्रमामुळे परिसरातील निसर्गप्रेमींना  अनेक प्रकारची कमळे पाहायला मिळतात.

 कमळ कंदवाला ‘बाबा’!
-कुणाला कमळाची फुलं हवी असलीत की, अनेकांची पावलं त्यांच्याकडे वळतात. त्यावेळी कमळ फूल मिळाले नाही, म्हणून नाराज होणाºयांना संजय गुरव कमळ कंद देतात. कमळाचं रोपटं देत, समोरच्या व्यक्तीच्या चेहºयावर हास्य फुलविण्याचा नवा छंद त्यांनी आता जोपासला आहे. त्यामुळे खामगाव आणि परिसरातच नव्हेतर समाज माध्यमांवर संजय गुरव यांना ‘कमळ कंद’वाले बाबा म्हणून ओळखल्या जावू लागले आहे.

 
 कमळ कंद, बिजांचे संकलन!
- घरावरील कमळ टेरेस बाग आणि परिसरातील तलाव कमळमय करण्यासाठी संजय गुरव यांनी शास्त्रशुध्द अभ्यास केला. मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगढ या राज्यासोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपºयातील  वेगवेगळ्या ठिकाणाहून कमळकंद आणि बिजांचे संकलन केले. अकोला जिल्ह्यातील भिकूंड नदीपात्रातील नैसर्गिक कमळाचीही बाग संजय गुरव यांनी फुलविली असून, खामगाव आणि परिसरातील अनेक तलावात या कंदांचे रोपण केले आहे. त्यांच्या बीज संकलन आणि कंद संकलन उपक्रमाला आता अनेक निसर्गप्रेमींची साथ लाभत आहे.
 
 
कमळाचे औषधी गुणधर्म
कमळ हे थंड, त्वचेला उजळविण्यासाठी, चवीला गोड, सर्दी खोकल्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. त्यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कमळ हे हृदयासाठी फार उपयुक्त असते. जर हृदय कमजोर असेल तर कमळाची फुले, मध, लोणी, साखर हे सगळं एकत्र करून औषध म्हणून ते खाल्ले जाते. सूर्यमुखी कमळ चवीला थंड असते. त्याचा उपयोग विषबाधा झाल्यास, झाल्यावर, कफ, रक्ताच्या गुठळ्यांसाठी, तहान भागवण्यास, रक्तवाढीसाठी केला जातो. त्याचप्रमाणे कमळाच्या पानांपासून जेवणाच्या पत्रावळीही केल्या जातात. कमळाची पाने एकमेकांवर दाबून ती सुकवली जातात. त्या सुकलेल्या पानांची पत्रावळी बनलेली असते.


 
- संजय गुरव ‘तलाव तिथं कमळ’ या उपक्रमाची माहिती मुंबई येथील समाज माध्यमावरील एका ग्रुपवर मिळाली. बाळापूर येथील भिकूंड नदीतील नैसर्गिक कमळाबाबत आकर्षण निर्माण झाल्याने, जून महिन्यात तिथं भेट दिली. योगायोगाने तेथे निसर्गप्रेमी संजय गुरव यांची भेट झाली. कमळ उपक्रमाबाबत मार्गदर्शन मिळाले.
-डॉ. मनिषा नानोटी
निसर्गप्रेमी, अकोला.

 
‘तलाव तेथे कमळ’या उपक्रमाशी सुरूवातीपासूनच जुळलो आहे. बाळापूर येथील भिकंूड नदीसोबतच इतरही ठिकाणी बीज संकलन तसेच कंद गोळा करण्यासाठी नियमित जात आहे. कमळ फूलांचे संवर्धनासाठीच या उपक्रमाशी जुळलो आहे.
किशोर भागवत
निसर्ग प्रेमी, खामगाव.
 

Web Title: Teacher's struggle to blossom lotus everywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.