शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शिक्षकांचे ऑनलाइन समायोजन योग्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 00:57 IST

बुलडाणा:  शासनाच्या शैक्षणिक विभागातर्फे शिक्षकांच्या  ऑनलाइन समायोजन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक अ ितरिक्त शिक्षकांना काम मिळणार असून, रिक्त जागा असलेल्या  शाळेचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. त्यामुळे  शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे, असा सूर   ‘शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे की  अयोग्य?’ या विषयावर  बुधवारी आयोजित परिचर्चेत उमटला.  

ठळक मुद्देलोकमत परिचर्चेतील सूर नियमावलीत बदल करणे आवश्यक

बुलडाणा:  शासनाच्या शैक्षणिक विभागातर्फे शिक्षकांच्या  ऑनलाइन समायोजन प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे अनेक अ ितरिक्त शिक्षकांना काम मिळणार असून, रिक्त जागा असलेल्या  शाळेचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. त्यामुळे  शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे, असा सूर   ‘शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे की  अयोग्य?’ या विषयावर  बुधवारी आयोजित परिचर्चेत उमटला.  देशाची डिजिटल इंडियाकडे वाटचाल सुरू असून, सर्वच कामे  ऑनलाइन होत आहेत. त्यात शिक्षक विभाग मागे नाही. सध्या  शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत  अतिरिक्त शिक्षकाची माहिती टाकण्यात येत असून, रिक्त  असलेल्या शाळेतील पदे समायोजनाद्वारे भरण्यात येत आहे. या  प्रक्रियेत अतिरिक्त शिक्षकाला तालुक्यातील २0 गावांपैकी एक  गावातील रिक्त असलेल्या शाळेवर नियुक्ती मिळणार आहे. या  प्रक्रियेमुळे अतिरिक्त शिक्षकाला काम मिळणार असून, रिक्त  जागा असलेल्या शाळेचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे; मात्र  या प्रक्रियेत खासगी संस्थेचे काही प्रमाणात नुकसान होणार   आहे. त्यामुळे   ऑनलाइन प्रक्रिया चांगली असली त्याच्या  नियमात बदल करणे आवश्यक असल्याचे सहभागी मान्यवरांनी  सांगितले. 

शिक्षक समायोजनची ऑनलाइन प्रक्रिया अयोग्य असून, त्यामुळे  अनेक चांगल्या शिक्षकांवर अन्याय होणार आहे. यापूर्वी समु पदेशन करून शिक्षकांच्या बदल्या करण्यात येत होत्या. त्यात  बदलीपात्र शिक्षकाला तालुक्यातील ५0 गावांपैकी एका गावाची  निवड करण्याची संधी मिळत होती; मात्र ऑनलाइन प्रक्रियेत  तालुक्यातील फक्त २0 गावांपैकी एक गाव निवड करण्याची  संधी मिळणार आहे.  त्यामुळे संबंधित शिक्षकाला योग्य गावाची  निवड करण्याची संधी मिळेल किंवा नाही, हे सांगत येत नाही.  त्यामुळे सदर पद्धत चुकीची आहे.                                             - रवींद्र नादरकर, शिक्षक, चिखली.

शिक्षण विभागातर्फे शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ऑनलाइन  समायोजन करण्यात येत आहे. सदर पद्धत योग्य असून, त्यामुळे  भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. अनेक ठिकाणी जिल्हा परिषद  शाळेत अतिरिक्त शिक्षक असताना राजकीय हस्तक्षेपामुळे  शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येत नाही. त्यामुळे ऑनलाइन  समायोजन प्रक्रिया चांगली असून, भ्रष्टाचार व चिरिमिरीला  आळा बसणार आहे. ज्या संस्था ऑनलाइन प्रक्रियेतून आलेल्या  शिक्षकाला रुजू करून घेणार नाहीत, त्या संस्थेचे अनुदान  प्रक्रिया थांबणार आहे, त्यामुळे हा निर्णय चांगला आहे.- डी. डी.वायाळ, शिक्षक, बुलडाणा.

शिक्षकांची ऑनलाइन समायोजन प्रक्रिया योग्य आहे; परंतु  शिक्षक समायोजनासंदर्भात खाजगी संस्थेचे अधिकार काढण्यात  आल्यामुळे शाळेचे व संस्थेचे काही  नुकसान होण्याची शक्यता  आहे. खासगी संस्थेतील अतिरिक्त ठरलेला शिक्षक कनिष्ठ  शिक्षक असतो. त्याचे समायोजन केल्यानंतर रिक्त जागा  असलेल्या संस्थेला चांगला शिक्षक हवा असल्यास तसेच  समायोजनानुसार येणारा शिक्षक अनुभवाने कमी असल्यास त्या  संस्थेचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे रिक्त जागा  असलेल्या संस्थेत समायोजनेनुसार शिक्षक द्यावा; मात्र त्याची  मुलाखत घेण्याचे अधिकार संस्थेला देणे आवश्यक आहे.      -सुनील जवंजाळ, प्राचार्य तथा अभ्यास मंडळ सदस्य,  कोलवड, बुलडाणा.

शिक्षण विभागातर्फे सुरू असलेली शिक्षक समायोजन प्रक्रिया  योग्यच आहे. अनेक शाळेत अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना विना  कामाचे वेतन देण्यात येत होते. तर अनेक शाळेत रिक्त  असलेल्या जागेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते;  मात्र ऑनलाइन समायोजन योजनेमुळे बिंदू नामावलीनुसार रिक्त  पदावर विषयनिहाय नियुक्ती मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे  शैक्षणिक नुकसान थांबणार आहे. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना  काम मिळून शासनाचे होणारे नुकसान टळणार असून, रिक्त  जागा भरल्या जाणार आहेत.   - रामेश्‍वर तायडे, मुख्याध्यापक, शरद पवार हायस्कूल,  भडगाव ता. बुलडाणा

जिल्ह्यातील अनेक खासगी संस्थेत शिक्षकांच्या अनेक जागा  रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात शैक्षणिक नुकसान  होते; मात्र शिक्षकांच्या ऑनलाइन समायोजन योजनेमुळे खासगी  संस्थेत जागा भरल्या जाणार असून, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक  नुकसान टळणार आहे; मात्र या प्रक्रियेमुळे खासगी संस्थेचे काही  प्रमाणात नुकसान होणार आहे. संस्थेला आवश्यक असलेला  उमेदवार ऑनलाइन प्रक्रियेनुसार येणार असल्यामुळे संस्थेला  कशा प्रकारचा उमेदवार हवा, याबाबत निवड करण्याचे  अधिकार नसल्यामुळे संस्थेचे नुकसान होणार आहे. - बाळ अयाचित, शिक्षक, बुलडाणा.