रस्ता अपघातात शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:18 IST2017-08-12T01:18:29+5:302017-08-12T01:18:41+5:30

मलकापूर: खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार मोटारसायकलवर आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना  ११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात शिक्षकाच्या पत्नीच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.

Teacher's death in a road accident | रस्ता अपघातात शिक्षकाचा मृत्यू

रस्ता अपघातात शिक्षकाचा मृत्यू

ठळक मुद्देखड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवर आदळली

लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर: खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार मोटारसायकलवर आदळून झालेल्या अपघातात शिक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना  ११ रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. यात शिक्षकाच्या पत्नीच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत.
येथील गोकुलधाममधील रहिवासी पंडित भोनू वाघ (वय ५५) त्यांच्या पत्नी माया यांच्या समवेत ११ रोजी मोटारसायकलने एमएच२८-एल५५६ त्यांचे राहते गाव बोदवड तालुक्यातील रांजणा येथून मलकापूरकडे येत होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास विरुद्ध दिशेने भरधाव कार क्र.एमएच१७-एजे५५१९ खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात मोटारसायकलवर आदळली. या अपघातात शिक्षक पंडित वाघ यांच्या डोक्याला व छातीला जबरदस्त मार लागून त्यांचा मृत्यू झाला.  तर शिक्षकाच्या पत्नी माया यांचा पाय तुटला. त्यादेखील गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत.  कारमधील प्रवासी अहमदनगर येथील ग्रामसेवक आहेत. शेगाव येथे ग्रामसेवक संघाची बैठक आटोपून परतीच्या वाटेवर होते. याप्रकरणी उशिरापर्यंंत पोलीस कारवाई सुरू होती.  

Web Title: Teacher's death in a road accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.