शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक बदल्यांचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 17:34 IST

बुलडाणा: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून बदलीपात्र शिक्षकांना यादीची प्रतीक्षा लागली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आल्याने याचा परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 

- ब्रम्हानंद जाधवबुलडाणा: जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीची आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाली असून बदलीपात्र शिक्षकांना यादीची प्रतीक्षा लागली आहे. ऐन परीक्षेच्या तोंडावर शिक्षक बदल्यांचे सत्र सुरू करण्यात आल्याने याचा परीक्षांच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या काही वर्षापासून जिल्हा परिषद शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत हजारो शिक्षकांच्या आॅनलाइन पद्धतीने बदल्या झाल्यामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील शिक्षकांना स्व जिल्ह्यात येण्याची संधी मिळाली आहे. अनेक वर्ष बाहेरील जिल्ह्यात सेवा केल्यानंतर स्व जिल्ह्यात आल्याचा आनंद या शिक्षकांमध्ये पाहावयास मिळतो. यामध्ये काही शिक्षकांच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या आहेत. शिक्षकांची ही सर्व बदली प्रक्रिया दिवाळी सुट्टी किंवा उन्हाळी सुट्टीमध्ये पूर्ण करण्याच्या सुचना आहेत. शैक्षणिक सत्रामध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया ही शैक्षणिक सत्र सुरू होण्याआधी राबविणे आवश्यक असते. मात्र आता विद्यार्थ्यांच्या परीक्षा जवळ आलेल्या असतानाच शिक्षण विभागाने आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया हाती घेतली आहे. २१ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होत आहे. तर १ मार्च ते २२ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये प्रत्येक शाळेत वार्षिक परीक्षांचे नियोजन करण्यात येते. अशाप्रकारे फेब्रुवारी ते मेपर्यंतचा कालावधी परीक्षांमध्येच जातो; मात्र याच कालावधीत शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षेसह विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

 पहिला दिवस ‘वेटींग’वरचआंतरजिल्हा बदली प्रक्रियेतील शिक्षकांची यादी ९ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध होणार होती. मात्र शनिवारी उशिरापर्यंत यासंदर्भातची यादी उपलब्ध झाली नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे. मात्र बदली प्रक्रियेचा पहिला दिवस ‘वेटींग’वरच गेल्याचे दिसून येते. 

 बदलीनंतर स्पष्ट होणार भरतीच्या जागासध्या शिक्षक भरतीचे वेध लागले आहेत. भरतीप्रक्रियेच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवर सर्व माहितीही भरण्यात आलेली आहे. मात्र जिल्ह्यात किती जागांसाठी भरती होणार आहे, हे आंतरजिल्हा बदली प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची निश्चित संख्या अद्यापही गुलदस्त्यात आहे. 

 आंतरजिल्हा बदली प्रक्रिया आॅनलाइन होत असून अद्यापपर्यंत त्याची यादी उपलब्ध झाली नाही. या बदली प्रक्रियेनंतरच शिक्षक भरतीच्या जागाही समोर येतील. - अनिल आकाळ, उप शिक्षणाधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक