तिहेरी अपघातात शिक्षक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 00:41 IST2017-08-01T00:40:22+5:302017-08-01T00:41:35+5:30
नांदुरा : ट्रक-टाटा सफारी आणि मोटार सायकलच्या तिहेरी अपघातात पिंप्री अढाव येथील मोटार सायकलस्वार शिक्षक संजय अढाव जागीच ठार झाले. ही घटना वडनेर-नायगाव दरम्यान दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.

तिहेरी अपघातात शिक्षक ठार
ठळक मुद्देट्रक-टाटा सफारी आणि मोटार सायकलच्या तिहेरी अपघातमोटार सायकलस्वार शिक्षक संजय अढाव जागीच ठार वडनेर-नायगाव दरम्यान घडली घटना
नांदुरा : ट्रक-टाटा सफारी आणि मोटार सायकलच्या तिहेरी अपघातात पिंप्री अढाव येथील मोटार सायकलस्वार शिक्षक संजय अढाव जागीच ठार झाले. ही घटना वडनेर-नायगाव दरम्यान दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
एम.एच.२८ एटी ४८४८ या सफारी कारचे टायर फुटल्यामुळे ही कार समोरच्या ट्रकवर धडकली. त्याचवेळी एम.एच.२८-ए.एच. ६०१९ ही मोटारसायकल सफारी कारवर धडकली. या धडकेने मोटार सायकलवरील शिक्षक संजय अंबादास अढाव (वय ४६) हे जागीच ठार झाले. मोताळा तालुक्यातील वडगाव येथे कार्यरत असलेले अढाव मोटारसायकलने घरी परतत होते. त्याचवेळी हा अपघात घडला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.