डोंगरदिवे व रायबोर्डे यांना शिक्षक पुरस्कार

By Admin | Updated: August 21, 2015 23:35 IST2015-08-21T23:35:34+5:302015-08-21T23:35:34+5:30

राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित.

Teacher Award for Dongdhidee and Raiborde | डोंगरदिवे व रायबोर्डे यांना शिक्षक पुरस्कार

डोंगरदिवे व रायबोर्डे यांना शिक्षक पुरस्कार

बुलडाणा : बोरी येथील जि.प.उ. प्राथमिक शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले किरण शिवहर डोंगरदिवे व जयंत रायबोर्डे यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित झाला आहे.
ठाणे येथे ५ सप्टेंबर रोजी होणार्‍या शासकीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार डोंगरदिवे व रायबोर्डे यांना दिला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राला प्रतिभावंत कवी व अभ्यासू समीक्षक म्हणून किरण डोंगरदिवे परिचित आहेत. जयंत रायबोर्डे हे बुलडाणा तालुक्यातील हतेडी येथील श्री शिवाजी विद्यालयाचे तत्कालीन मुख्याध्यापक व सध्या वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
आदर्श शिक्षक पुरस्काराबाबत किरण डोंगरदिवे म्हणले की, साहित्यक्षेत्रातील अनेक पुरस्कार प्राप्त झालेले असले तरी माझ्यातील शिक्षकाला शाबासकी देणारा महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार हा माझ्यासाठी सर्वोच्च आहे.
जयंत रायबोर्डे हे शैक्षणिक क्षेत्रासह सिनेमा, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील केलेल्या कामगिरीची दखल राज्य शासनाने घेतल्यामुळेच पुढील कार्यास प्रोत्साहन मिळाले असल्याची प्रतिक्रिया रायबोर्डे यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.

Web Title: Teacher Award for Dongdhidee and Raiborde