रोहड्याची तपोवनदेवी
By Admin | Updated: September 27, 2014 00:12 IST2014-09-27T00:12:36+5:302014-09-27T00:12:36+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील शक्तिपीठ.

रोहड्याची तपोवनदेवी
बुलडाणा: १६00 पूर्वी चिखली-देऊळगाव राजा मार्गावरील रोहडा येथे चिखली येथील रेणुका माता मंदिराची स्थापना करणार्या स्वामी बचानंद यांचे शिष्य नारायण स्वामी यांनी तपोवन देवीची स्थापना केली. त्याकाळी परिसरातील दुर्गम असलेल्या तपोभूमिमुळे या देवीला तपोवन देवी नाव पडले. सिंदखेड राजाचे लखुजीराजे अर्थात जिजाऊंचे पिताश्री लढाईसाठी निघण्यापूर्वी याच मंदिर परिसरात त्यांचा मुक्काम असे, अशी ऐतिहासिक पृष्ठभूमि असणारे तपोवन देवीचे मंदिर सुरडकर कुटुंबियांच्या ताब्यात होते. मुगल बादशहाने सुरडकरांना देशमुखी बहाल केली, तेव्हापासून सदर मंदिर वंशपरंपरेने त्यांच्या ताब्यात होते. १२ मार्च १९८४ रोजी परिसरातील भाविकांनी न्यायालयीन लढाई जिंकून मंदिराचा ताबा घेतला.