‘स्वाभिमानी’चे झोपा काढो आंदोलन
By Admin | Updated: August 2, 2016 01:34 IST2016-08-02T01:34:14+5:302016-08-02T01:34:14+5:30
शासनाकडून शेतक-यांची थट्टा; तहसीलदारास निवेदन.

‘स्वाभिमानी’चे झोपा काढो आंदोलन
खामगाव (जि. बुलडाणा) : सन २0१५ या मागील वर्षात तालुक्यातील दुष्काळग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना एकरी फक्त २८ रु. ८0 पै. पीक विमा मंजूर करुन शेतकर्यांची थट्टा केली आहे. याबाबत निवेदन दिल्यानंतरही अद्याप दखल घेण्यात आली नाही, त्यामुळे संबंधित प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सोमवारी नांदुरा तहसीलदार वैशाली देवकर यांच्या दालनातच शेकडो शेतकर्यांसह ह्यझोपा काढोह्ण हे अभिनव आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांचे नेतृत्वात करण्यात आले. याबाबत तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, २0१५ च्या हंगामात तालुक्यात ९0 टक्के सोयाबीनची पेरणी झाली असताना उशिरा आलेल्या व अत्यल्प झालेल्या पावसामुळे सोयाबीनला फुले व शेंगा सुध्दा लागलेल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकर्यांना पेरणी मोडावी लागली होती. या नुकसानीच्या गावनिहाय, समितीसह, गटांचे पंचनाम्यावर सुध्दा उत्पन्न निरंक (शून्य) आलेले आहेत. अशा भीषण दुष्काळजन्य परिस्थितीमुळे राबराब राबून जगाला धान्य पुरविणार्या शेतकर्यांवर उपासमारीची वेळ आलेली असताना तालुक्यातील दुष्काळग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकर्यांना एकरी २८ रु. ८0 पै. पीक विमा मंजूर करण्यात आला. याबाबत १२ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदन देवून शेतकर्यांवरील अन्याय दूर करण्याची मागणी केली होती. मात्र या निवेदनाची अधिकार्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे संबंधित अधिकार्यांच्या, प्रशासनाच्या कुंभकर्णी झोपेमुळे शासनाची दिशाभूल करीत, शासनाला बदनाम करुन शेतकर्यांची क्रूर थट्टा करण्यात आली असून प्रशासनाची कुंभकर्णी झोप उघडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांचे नेतृत्वात सदरचे आंदोलन करण्यात आले.