संचेतींच्या कार्यालयासमोर धरणे
By Admin | Updated: June 8, 2017 02:34 IST2017-06-08T02:34:02+5:302017-06-08T02:34:02+5:30
मलकापूर : शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी भाराकाँ, राकाँ, शेतकरी संघटना, किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आमदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

संचेतींच्या कार्यालयासमोर धरणे
मलकापूर : शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी भाराकाँ, राकाँ, शेतकरी संघटना, किसान सभा व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आमदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या आ.संचेतींनी सरकार शेतकऱ्यांच्या सोबत असून, लवकरच शासन शेतकरी हिताचा निर्णय जाहीर करेल, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे उपस्थित होत्या.
शेतकरी आंदोलनाच्या सहाव्या दिवशी भाराकाँचे शहर अध्यक्ष राजू पाटील, शेतकरी संघटनेचे दामोधर शर्मा, किसान सभेचे दादा रायपुरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमोल राऊत व विवेक पाटील यांच्या नेतृत्वात पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी आ.संचेती यांच्या कार्यालयावर धडकले. संचेती यांच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त असल्याने शेतकरी व विविध पक्षांच्या नेत्यांनी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई शिवचंद्र तायडे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाराकाँचे शहर अध्यक्ष राजू पाटील, नगरसेवक अनिल गांधी, बंडू चौधरी, सुनील बगाडे, गजानन ठोसर, प्रल्हाद ढोले, प्रवीण पाटील, राजेश चव्हाण, एकनाथ डवले, बबन तायडे, विजय डागा, ज्ञानदेव सातव, अशोक डांगे, सुरेश भोजने, बाबूराव महाले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते. ३९ आंदोलनकर्त्यांना शहर पोलिसांनी स्थानबद्ध केले.