डोणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक परत घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:39 IST2021-08-20T04:39:54+5:302021-08-20T04:39:54+5:30
डोणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जानेवारी २०२१ दरम्यान रीतसर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पार पडली. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान ...

डोणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक परत घ्या
डोणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक जानेवारी २०२१ दरम्यान रीतसर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे पार पडली. १५ जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया झाली व १८ फेब्रुवारी रोजी १७ ग्रामपंचायत सदस्य हे निवडून आले. मात्र १० फेब्रुवारी रोजी डोणगाव निवडणूक अधिकारी यांनी सरपंच पदाची निवडणूक घेण्याचे ठरविले. परंतु एका सदस्याने या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाने सरपंच पदाच्या निवडणुकीला स्थगिती दिली. त्यानंतर ८ जुलै रोजी स्थगिती न्यायालयाने उठवली असता निवडणूक विभाग व जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाने अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. यामुळे डोणगाव येथील विकास कामांवर परिणाम होत असल्यामुळे विकासात्मक कामे थांबली असून, सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. ९ सप्टेंबर रोजीच या ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला आहे. मात्र शासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील जवळजवळ मुदत संपलेल्या सर्वच ग्रामपंचायतवर प्रशासक नियुक्त केले होते. आता तब्बल ११ महिन्यापासून या ग्रामपंचायतीचा कारभार हा प्रशासक यांच्याकडे आहे. मात्र इतर शासकीय ठराव तसेच शासकीय योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायत कमिटी ही सक्षमपणे आपल्या वाॅर्डच्या गरजेनुसार व समस्यांचे स्वरुप पाहून काम करु शकते. मात्र याकडे निवडणूक विभाग व जिल्हा प्रशासनाने तत्काळ उचित कार्यवाही करणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ४ नुसार निवडणूक पार पडल्यानंतर कमीत कमी ६ महिन्यांच्या आत नवीन ग्रामपंचायत स्थापन करणेबाबत सुचविले आहे. (सदर ग्रामपंचायतीला सरपंच निवडून आणणे बंधनकारक असते). तरीसुद्धा तसे न झाल्याने या नियमानुसार संपूर्ण कमिटी तातडीने आयुक्त यांनी बरखास्त करुन पुनश्च निवडणूक प्रक्रिया करुन घेऊन ग्रामपंचायत स्थापन करणे कामी नियमानुसार कार्यवाही करावी करिता देवेंद्र रावसाहेब आखाडे, ओंकार चव्हाण यांनी मेहकर तहसीलदार डाॅ. संजय गरकल यांच्या मार्फत मुख्य निवडणूक आयुक्त व विभागीय आयुक्त यांच्याकडे निवेदनाच्या अनुषंगाने मागणी केली आहे.
190821\new doc 2021-08-19 13.12.07_1.jpg
???????? ????? ?????? ?????? ???????? ?????