जलतरण स्पध्रेत विजय जायभाये करणार राज्याचे नेतृत्व!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 00:40 IST2017-10-24T00:40:11+5:302017-10-24T00:40:26+5:30
बुलडाणा : येथील विजय नवृत्ती जायभाये हे नांदेड येथे होत असलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पध्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.

जलतरण स्पध्रेत विजय जायभाये करणार राज्याचे नेतृत्व!
ठळक मुद्देनांदेड येथे होणार राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : येथील विजय नवृत्ती जायभाये हे नांदेड येथे होत असलेल्या राष्ट्रीय मास्टर्स अक्वाटीक असोसिएशन स्पध्रेमध्ये महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
२७, २८ व २९ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मास्टर्स असोसिएशन द्वारा नांदेड येथे ४ थी जलतरण स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पध्रेचे महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधीत्व बुलडाणा येथील विजय नवृत्ती जायभाये करणार आहेत. ही जबाबदारी त्यांच्यावर आयोजकांनी सोपविली आहे. त्यांच्यासोबत बुलडाणा येथील श्यामराव काळे व व्ही.आर.चव्हाण यांचीसुद्धा निवड करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.