बेस्ट बिफाेरकडे मिठाई विक्रेत्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST2021-08-26T04:36:56+5:302021-08-26T04:36:56+5:30
रियालिटी चेक संदीप वानखडे बुलडाणा : खुल्या मिठाईवर बेस्ट बिफाेर टाकण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र, बुलडाणा ...

बेस्ट बिफाेरकडे मिठाई विक्रेत्यांचे दुर्लक्ष
रियालिटी चेक
संदीप वानखडे
बुलडाणा : खुल्या मिठाईवर बेस्ट बिफाेर टाकण्याचे आदेश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. मात्र, बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील अनेक मिठाई विक्रेते बेस्ट बिफाेर न टाकताच सर्रास विक्री करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची गरज आहे.
पाकीट बंद मिठाई व इतर पदार्थांवर बेस्ट बिफाेर तारीख देण्यात येते. यामध्ये तयार केल्याचे तसेच मुदत संपणार असल्याचा उल्लेख असताे. मात्र, खुल्या मिठाईवर अशी कुठलीही तारीख नसल्याने मुदत संपलेला माल ग्राहकांच्या माथी मारण्याच्या तक्रारी वाढल्या हाेत्या. त्यामुळे, अन्न व औषध प्रशासन विभागाने परिपत्र काढून खुल्या मिठाईवरही बेस्ट बिफाेर तारीख टाकणे अनिवार्य केले हाेते. हा आदेश आल्यानंतर काही दिवस बुलडाणा शहरासह जिल्ह्यातील मिठाई विक्रेत्यांनी बेस्ट बिफाेर तारीख टाकणे सुरू केले हाेते. त्यानंतर मात्र, आता बहुतांश दुकानदार बेस्ट बिफाेर टाकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, ग्राहकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करण्याची गरज आहे.
मुदतबाह्य मिठाई विकण्याची शक्यता
काेराेना निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर मिठाईसह इतर दुकाने दिवसभर सुरू आहेत. त्यातच अनेक मिठाई विक्रेते खुल्या मिठाईवर बेस्ट बिफाेर टाकत नसल्याने मुदतबाह्य मिठाई विक्री करण्याची शक्यता आहे. त्यामुळे, ग्राहकांनी खुली मिठाई घेताना बेस्ट बिफाेर पाहूनच खरेदी करण्याची गरज आहे.
लसीकरणाची पडताळणीच नाही
काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मिठाईसह इतर दुकानांची वेळ रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आली आहे. दुकाने सुरू करण्यापूर्वी दुकानदार आणि तेथे काम करीत असलेल्या कामगारांनी काेराेना लसीचे दाेन्ही डाेस घेणे अनिवार्य करण्यात आले आहे तसेच ज्यांनी लस घेतली नसेल त्यांनी १५ दिवसांचा आरटीपीसीआर अहवाल साेबत ठेवणे गरजेचे आहे. मात्र, याची पडताळणीच हाेत नसल्याचे चित्र आहे.
अनेकांना मास्कचा विसर
शहरातील मिठाईच्या अनेक दुकानांमध्ये काम करणारे कामगार आणि दुकानदारांना मास्कची ॲलर्जी असल्याचे चित्र आहे. काेराेनाचे रुग्ण कमी झाले असले तरी प्रशासनाच्या वतीने नियमांचे पालन करण्याचे निर्देश आहेत. मात्र, बहुतांश मिठाई विक्रेत्यांना मास्कची ॲलर्जी असल्याचे चित्र आहे.
खुल्या मिठाईवर बेस्ट बिफाेर टाकणे आवश्यक आहे. त्याविषयी सर्व मिठाई विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कारवाई करण्याची ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा एकदा तपासणी माेहीम राबवू़ तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू.
एस़. डी़. केदारे, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, बुलडाणा