शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाभिमानी’चा संग्रामपूर तहसील कार्यालयात मुक्काम; गारपीटग्रस्तांना  शासकीय अनुदानाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:19 IST

संग्रामपूर : सन २0१४-१५ मध्ये झालेल्या गारपीट नुकसानाची मदत अद्याप न  मिळाल्याने स्वाभिमानी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयात शेतकर्‍यांसह मु क्काम ठोकला आहे. 

ठळक मुद्दे२0१४-१५ मध्ये झाली होती गारपीटएकलारा बानोदा, बानोदा बु. व काटेल या तीन गावातील शेतकरी शसकीय मदतीपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : सन २0१४-१५ मध्ये झालेल्या गारपीट नुकसानाची मदत अद्याप न  मिळाल्याने स्वाभिमानी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयात शेतकर्‍यांसह मु क्काम ठोकला आहे. तालुक्यातील काही गावामधील शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान  झाले होते. शासनाने या नुकसानीचे पंचनामेही तत्काळ केले होते. गारपीटमुळे  झालेल्या नुकसानाचे अनुदान तहसीलमार्फत सात गावांना वाटप करण्यात  आले होते; मात्र एकलारा बानोदा, बानोदा बु. व काटेल या तीन गावांचा  तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी हेतुपुरस्सरपणे या तीन  गावांना गावातील शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यात अनुदान रक्कम जमा केली  नाही. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी  अनुदानाची रक्कम त्वरित शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, यासाठी  शेतकर्‍यांसह २८ डिसेंबरपासून संग्रामपूर तहसील कार्यालयाच्या आवारात मु क्काम आंदोलन सुरु केले आहे.  गेल्या चार वर्षापासून शेतकर्‍यांना  दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी आत्मह त्या केल्या आहेत. यावर्षीसुद्धा दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व  पिके शेतकर्‍यांच्या हातून निघून गेली आहेत. अशा परिस्थितीतही शासन शेतकर्‍यांना पुन्हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त  करण्याचे काम करीत आहे, असा आरोप संघटनेने केला आहे. शासनाने  दिलेल्या अनुदानाची रक्कम तत्काळ जमा करण्यात यावी. जोपर्यंत गारपिटीचे  अनुदान व शेतकर्‍यांच्या मागण्या मंजूर होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच  ठेवण्याचा पवित्रा जिल्हाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी घेतला होता. आंदोलनात  स्वाभिमानीचे रोशन देशमुख, शेख अस्लम, उज्ज्वल चोपडे, अनंता मानकर,  तेजराव बोरसे, प्रकाश मेहंगे, आशिष नांदोकार, मनोहर कुकडे यांच्यासह शे तकरी सहभागी झाले आहेत. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाFarmerशेतकरीagitationआंदोलन