शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-अैारंगाबाद मार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चक्का जाम आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:33 IST

Swabhimani Shetkari Sanghatana's agitation स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन छेडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : घरगुती वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांच्या कृषीपंपाची वीज खंडित करण्याची अन्यायकारक मोहीम त्वरित थांबवावी. लॉकडाऊन काळातील वीज देयके माफ करावी, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यव्यापी रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. त्याअंतर्गत  स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात नागपूर ते औरंगाबाद महामार्गावर तालुक्यातील पेठ फाट्यावर ‘चक्काजाम’ आंदोलन करण्यात आले.  त्यामुळे तब्बल अडीच तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.दरम्यान, महावितरणने वीज देयक माफ करावे आणि वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवावी अन्यथा मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री निवासस्थानाचाही वीजपुरवठा खंडित करून त्यांच्या परिवारांनाही अंधारात चाचपडायला भाग पाडू, असा इशारा रविकांत तुपकर १९  मार्च रोजी या आंदोलनादरम्यान दिला. आक्रमक तुपकरांनी आंदोलनाचा इशारा देताच पोलीस प्रशासन अलर्ट होते. आंदोलनादरम्यान तैनात असलेल्या फौजफाट्यावरून त्याची तीव्रता दिसून आली.  दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी व रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात राज्यभरात  सध्या उपरोक्त दोन्ही मागण्यांसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जिल्हाही ढवळून निघाला. आंदोलनादरम्यान बैलगाड्या रस्त्यावर आडव्या लावण्यात आल्या होता. सकाळपासूनच स्वाभिमानीचे कार्यकर्ते या मार्गावर ठाण मांडून बसले होते. महावितरणला मागणी मान्य करणे शक्य नसले तर त्यांनी शेतकऱ्यांची वीज कट करूनच दाखवावी, आम्ही मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्याच्या निवासस्थानाची वीज कापू असा इशाराच या आंदोलनातून तुपकरांनी दिला.  आंदोलनामध्ये नितीन राजपूत, विनायक सरनाईक, सुधाकर तायडे, रामेश्वर अंभोरे, संतोष शेळके, भारत खंडागळे, अनिल चव्हाण, रविराज टाले, गणेश थुट्टे,  रमेश कुटे  सहभागी झाले होते.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाbuldhanaबुलडाणाagitationआंदोलनRavikant Tupkarरविकांत तुपकर