स्वाभिमानीने केले शालेय साहित्य वाटप

By Admin | Updated: July 3, 2017 20:02 IST2017-07-03T20:02:48+5:302017-07-03T20:02:48+5:30

चिखली : तालुक्यातील येवता येथे नवप्रवेशीत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वाभिमानी शेतकरी घटनेच्यावतीने कृषी दिनाचे औचित्त साधून शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

Swabhimani has distributed school literature | स्वाभिमानीने केले शालेय साहित्य वाटप

स्वाभिमानीने केले शालेय साहित्य वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यातील येवता येथे नवप्रवेशीत चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वाभिमानी शेतकरी घटनेच्यावतीने कृषी दिनाचे औचित्त साधून शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
ग्रामस्थांनी गत वर्षी लागवड करून योग्य रितीने संगोपन केलेल्या वृक्षांचा जल्लोषात वाढदिवस साजरा करून यंदाही मोठ्या उत्साहात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविला. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाउपाध्यक्ष विनायक सरनाईक, अनिल चव्हाण, उध्दव थुट्टे पाटिल,  मुख्याध्यापक वाघ, सुरेश परीहार, त्र्यंबक सुरडकर, पंढरी परीहार, गणेश मंैद, सिद्धेश्वर परीहार, अरूण यंडाइत, महाडिक, आराख, बावस्कर, खाडे यांच्यासह शिक्षक व ग्रामस्थ उपस्थीत होते.

Web Title: Swabhimani has distributed school literature