शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

'दुष्काळी' मदतीसाठी 'स्वाभिमानी'चे कोरड्या विहिरीत आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 15:53 IST

खामगाव: तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दुष्काळी मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी कोरड्या विहिरीत आंदोलन केले. पारखेड ता.खामगाव येथे हे आंदोलन करण्यात आले.

खामगाव: तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दुष्काळी मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी कोरड्या विहिरीत आंदोलन केले. पारखेड ता.खामगाव येथे हे आंदोलन करण्यात आले. सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी यावेळी दिला.एकीकडे दुष्काळी परिस्थिती असताना, यावर राज्यकर्ते बोलायला  तयार नाहीत.  शेतकरी देशोधडीला लागत असतांना सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आंदोलन केल्याशिवाय हे सरकार कुंभकर्णी झोपेतून जागे होत नाही. असा आरोप स्वाभीमानीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे मंगळवारी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. खामगाव तालुक्यातील पारखेड गावात ५० फूट खोल विहिरीत उतरून स्वाभीमानीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. सकाळी सुमारे ९ वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यात आला; परंतु उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. तुरीचेअनुदानही शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यामुळे बळीराजा हताश झाला आहे. शेतकºयांच्या मतांवर निवडून  आलेल्या सरकारचे आता शेतकऱ्यांकडेच दुर्लक्ष झाले आहे.  परंतु जे शेतकरी कुणाला सत्तेत बसू शकतात; तेच शेतकरी सत्तेतून खालीही खेचू शकतात, हे सरकारने लक्षात घ्यावे. शासनाने याची गंभीर दखल घेतली नाही, तर यापुढे जनतेला एकत्र करून जिल्ह्यात एकाही मंत्र्याला  फिरू देणार नाही, असा इशारा जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी दिला. आंदोलनात राजू नाकाडे, संजय लहुडकार, सचिन पाटिल, गजानन धमोडे, अशोक देशमुख, अशोक यादगिरे, संजय नाकडे, अनिल देशमुख, अण्णा कुराडे, लक्ष्मण सोळंके, शिवाजी नाकडे, राम डोंगरदिवे, विजय ताडपते, महादेव पवार, रमेश नाकाडे आदींसह शेतकरी सहभागी झाले.  (प्रतिनिधी)

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाkhamgaonखामगावagitationआंदोलन