ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:42+5:302021-09-24T04:40:42+5:30

यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का सुदर्शन डिघोळे, पृथ्वीराज संतोष बोरकर, तनिष्क अविनाश तायडे या तीन विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड ...

Suyash of students in Olympiad | ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांचे सुयश

ऑलिम्पियाडमध्ये विद्यार्थ्यांचे सुयश

यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का सुदर्शन डिघोळे, पृथ्वीराज संतोष बोरकर, तनिष्क अविनाश तायडे या तीन विद्यार्थ्यांनी सायन्स ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे, तर अनुष्का प्रफुल्ल मिसाळ हिने मॅथस ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. या यशाबद्दल देऊळगाव राजा हायस्कूलतर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा, तसेच विजयसिंह सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे आवेदनपत्रे ऑनलाईन भरून सहकार्य केल्याबद्दल त्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी देऊळगाव राजा हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी. कोल्हे, पर्यवेक्षक डी. आर. पाटील, पी. के. राठोड, वाय. आर. गव्हाळे, एन. डी. दलाल, आर. ए. गुरव, एस. एल. बोरकर, प्रा. डॉ. अविनाश तायडे, ऑलिम्पियाड परीक्षा विभागप्रमुख एस. एन. कासदेकर तथा पालक सुदर्शन डिघोळे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Suyash of students in Olympiad