गावंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST2021-09-24T04:40:49+5:302021-09-24T04:40:49+5:30

स्टुडंट्स ऑलम्पिक असोसिएशनद्वारा १८ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयातील अमोल संजय सानप याने ५१ ते ५५ किलो ...

Suyash in the national boxing competition of Gawande College students | गावंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुयश

गावंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुयश

स्टुडंट्स ऑलम्पिक असोसिएशनद्वारा १८ सप्टेंबर रोजी आयोजित राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत महाविद्यालयातील अमोल संजय सानप याने ५१ ते ५५ किलो गटातून रजत पदक, नितीन रमेश नागरे याने ६० ते ६४ किलो गटातून रजत पदक आणि प्रथमेश संजाबराव देशमुख याने ६० ते ६४ किलो गटातून रजत पदक प्राप्त केले आहे. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास अशोक मानतकर याने अंडर १७ विभागातून कांस्य पदक प्राप्त केले आहे. यापूर्वी धर्मवीर आखाडा बुलडाणा येथे १६ ते १८ मार्च दरम्यान झालेल्या जिल्हा स्तरावरील निवड चाचणीत उपरोक्त खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करीत आपले स्थान जिल्ह्याच्या संघात निश्चित केले होते. तर २५ ते २८ ऑगस्ट दरम्यान सोलापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय सामन्यात देखील या सर्व खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन करीत प्रथम क्रमांक पटकावून आपले स्थान राज्याच्या संघात निश्चित केले होते. खेळाडूंना महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.आशिष बरडे व क्रीडा प्रशिक्षक संदीप नालेगावकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. दरम्यान यशप्राप्त विद्यार्थ्यांचा प्राचार्य डॉ.नीलेश गावंडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

Web Title: Suyash in the national boxing competition of Gawande College students