नांदुर्याचे तहसिलदार निलंबीत
By Admin | Updated: June 30, 2014 02:11 IST2014-06-29T23:21:24+5:302014-06-30T02:11:03+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले तहसिलदार इलियास खान रशिद खान निलंबीत.

नांदुर्याचे तहसिलदार निलंबीत
बुलडाणा : जप्त केलेला रेतीचा साठा परत देण्यासाठी १५ हजार रुपयाची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले नांदुरा तहसिल कार्यालयाचे तहसिलदार इलियास खान रशिद खान यांना अमरावतीचे आयुक्त यांनी निलंबीत केले. निलंबन काळात खान यांचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात हे मुख्यालया ठेवण्यात आले आहेत.
नांदुरा तहसिल कार्यालयामध्ये अवैध रेती वाहतुक करणारी वाहणे पकडण्यात आली होती. ही रेतीचे वाहणे सोडण्यासाठी तहसिलदार इलियास खान रशिद खान यांनी संबंधीत मालकाला २५ हजार रुपयाची मागणी केली होती. यावर तडजोड होऊन १५ हजार रुपये देण्याचे ठरले. दरम्यान ही १५ हजार रुपयाची रक्कम स्विकारताना तहसिलदार खान यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी रंगेहात पकडले. या प्रकरणी जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी विभागीय आयुक्ताकडे तजसिलदार खान यांचा प्रस्ताव पाठविला होता. यावर कारवाई करीत आयुक्तांनी तहसिलदार इलियास खान यांना निलंबीत करण्याचे आदेश दिले. तर निलंबन काळात त्यांचे मुख्यालय अकोला जिल्हाधिकारी कार्यालय ठेवण्यात आले आहे. दरम्यान नांदुरा तहसिल कार्यालयाचा तात्पुरता पदभार नायब तहसिलदार ए.एन. शेलार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांनी नुकतेच काढले आहेत.