प्राथमिक आरोग्य केंद्रावरील लिपिक निलंबित

By Admin | Updated: January 6, 2017 02:33 IST2017-01-06T02:33:50+5:302017-01-06T02:33:50+5:30

मासिक वेतनामध्ये भ्रष्टाचार.

Suspended clerk at primary health center | प्राथमिक आरोग्य केंद्रावरील लिपिक निलंबित

प्राथमिक आरोग्य केंद्रावरील लिपिक निलंबित

बुलडाणा , दि. ५- जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकार्‍यांनी वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंदावरील कार्यरत कनिष्ठ लिपिकास कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनामध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली निलंबित केले आहे.
तालुक्यातील ग्राम वरवंड येथे जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र चालते. या केंद्रावर कार्यरत कनिष्ठ लिपिक जी.एस.राजुरकर यांच्यावर कर्मचार्‍यांच्या मासिक वेतनाच्या बिलामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप होता.
केंद्रावरील वैद्यकीय अधिकारी डॉ.राठोड यांना सदर प्रकार लक्षात येताच त्यांनी यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे तक्रार केली. त्यानंतर चौकशीअंती जि.प. सीईओ दीपा मुधोळ यांनी लिपिक जी.एस.राजुरकर यांना निलंबित केले आहे. यामध्ये जवळपास दोन लाख रुपयांचा भ्रष्टाचार समोर आला आहे. याप्रकरणी आणखी चौकशी केल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची आणखी चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Suspended clerk at primary health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.