Corona Virus: खामगावात कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

By अनिल गवई | Published: August 9, 2022 04:37 PM2022-08-09T16:37:42+5:302022-08-09T16:38:13+5:30

Corona Virus: कोरोना विषाणू संसर्गाच्या चवथ्या लाटेकडे दुर्लक्ष करणे अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत. खामगावातील सामान्य रूग्णालयात ०९ आॅगस्ट रोजी एका कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.

Suspected corona patient dies in Khamgaon, health system on alert | Corona Virus: खामगावात कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

Corona Virus: खामगावात कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू, आरोग्य यंत्रणा सतर्क

Next

- अनिल गवई 
खामगाव - कोरोना विषाणू संसर्गाच्या चवथ्या लाटेकडे दुर्लक्ष करणे अंगलट येणार असल्याचे संकेत आहेत. खामगावातील सामान्य रूग्णालयात ०९ आॅगस्ट रोजी एका कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे.
गतकाही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, त्याचवेळी साथीच्या रोगांनी डोकेवर काढले आहे. सामान्य रूग्णालयात विविध आजाराच्या रूग्णांमध्ये वाढ होत असतानाच, मंगळवारी सकाळी एका कोरोना संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला. शहरातील एका प्रसिध्द वस्तीतील ७० वर्षीय पुरूष रूग्णाला उपचारार्थ सोमवारी रात्री सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान, मंगळवारी सकाळी ११ वाजता या संशयीत रूग्णाचा मृत्यू झाला. कोरोना संशयीत रूग्णाच्या मृत्यूबाबत  सामान्य रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. निलेश टापरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दुजोरा दिला.

Web Title: Suspected corona patient dies in Khamgaon, health system on alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.