शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
2
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

जालना -खामगाव रेल्वे मार्गाचा सर्वेक्षण अहवाल सकारात्मक राहण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 12:10 PM

Jalna-Khamgaon railway line ट्रॅफिक सर्व्हे पॉझिटिव्ह असेल असा विश्वास आयआरटीएसचे उप-मुख्य परिचालन प्रबंधक (सर्वेक्षण) सुरेश जैन यांनी येथे व्यक्त केला. 

लोकमत न्यूज नेटवर्क सिंदखेडराजा: जालना -खामगाव रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी या भागातील जनतेमध्ये अत्यंत उत्साह आहे. ही जनभावना पाहता आमच्या माध्यमातून केला जाणारा ट्रॅफिक सर्व्हे पॉझिटिव्ह असेल असा विश्वास आयआरटीएसचे उप-मुख्य परिचालन प्रबंधक (सर्वेक्षण) सुरेश जैन यांनी येथे व्यक्त केला. जालनाखामगाव रेल्वे मार्गाचा प्रश्न गेली ११० वर्ष प्रलंबित आहे. रेल्वे संघर्ष समितीच्या माध्यमातून तसेच सर्व पक्षीय प्रयत्नातून यासाठी अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. त्याचेच फलित म्हणून रेल्वेने या मार्गासाठी नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. ४ जानेवारीपासून ते सुरू झाले आहे. या पथकाने ६ जानेवारी रोजी सिंदखेड राजा येथे भेट दिली. यावेळी तहसीलदार सुनील सावंत, नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी नगराध्यक्ष नाझेर काजी, विविध क्षेत्रातील नागरिक, नगरसेवक उपस्थित होते.प्रारंभी पथक प्रमुख एस. सी. जैन यांनी उपस्थिताना रेल्वे मार्ग का आवश्यक आहे, याबाबत मत प्रदर्शन करण्याची संधी दिली. त्यामुळे उपस्थितांपैकी बोलणाऱ्या प्रत्येकाने एक मुद्दा घेऊन रेल्वेमार्ग गरजेचा का? हे पटवून सांगितले. त्यानुषंगाने जैन यांनीही जनभावना पाहता त्यांचा अहवालही सकारात्मक राहील, असे संकेत दिले. पथकात जैन यांच्या समवेत ट्रॅफिक इन्स्पेक्टर रवी गुजराल, मुकेश लाल, सिनियर सेक्शन इंजिनियर दिनेश बोरसे, अजय खनके यांचा समावेश होता. 

काजींनी दिला वासनिक अहवालाचा हवाला!माजी नगराध्यक्ष नाझेर काजी यांनी पथकासमोर १९८२ मध्ये याच रेल्वे मार्गासंदर्भात वासनिक समितीने सरकारला दिलेल्या अहवालाचा मुद्दा उपस्थित करून त्याची एक प्रत जैन यांना दिली. त्याच बरोबर मागील काळात रेल्वेला गरज वाटत नसलेला हा मार्ग आज किती गरजेचा आहे, हे अनेक उदाहरणांतून  स्पष्ट केले.

समृद्धीची स्मार्ट सिटी महत्त्वाची!मुंबई नागपूर या स्व.बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गालगत माळ सावरगाव येथे होणाऱ्या स्मार्ट सिटीचा उल्लेख यावेळी झाला. स्मार्ट सिटीमुळे या भागात अनेक उद्योग व्यवसाय येणाऱ्या काळात उभारले जाणार आहेत. यात विशेष करून कृषीवर आधारित उद्योग, व्यवसाय असल्याने कृषी मालाची वाहतूक रेल्वेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होऊ शकणार आहे. जालना येथील ड्राय पोर्ट याच रेल्वे मार्गाशी जोडला जाणार असल्याने जगभरात कृषी माल पाठवला जाऊ शकणार आहे.

टॅग्स :Sindkhed Rajaसिंदखेड राजाkhamgaonखामगावJalanaजालनाIndian Railwayभारतीय रेल्वे