शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाला सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2021 12:09 IST

Survey of out-of-school children in Buldana district begins : मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रत्येक पालक हा मुलाच्या भविष्याबाबत चिंतेत असतो. त्याने दररोज शाळेत जावे, चांगला अभ्यास करावा, असे पालकाला वाटते. परंतु शाळेत जाऊन खरंच नोकऱ्या लागणार का? असा अनोखा प्रश्न एका पालकाने शाळा बाह्य मुलांच्या सर्वेक्षणादरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांकडेच उपस्थित केला. शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. जिल्ह्यात ११ जूनपासून शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणास प्रारंभ करण्यात आला आहे. परंतु या मोहिमेदरम्यान पालकांकडून काय प्रश्न उपस्थित केले जातील, हे सांगता येत नाही. शाळाबाह्य मुलांच्या  सर्वेक्षण मोहिमेदरम्यान, देऊळगाव राजा येथील मुख्य मार्गावरून १२ वर्षांचा ओंकार नावाचा मुलगा आपल्या पालकांसह मेंढ्या घेऊन जात होता. दरम्यान, शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी त्या मुलाची विचारपूस केली. तू शाळेत जातोस का? कोणत्या वर्गात आहेस? तुझी शाळा कोणती आहे? असे अनेक प्रश्न त्या मुलाला विचारले. त्यावर त्याच्या पालकाने शाळेत जाऊन नोकऱ्या लागणार का? तो नोकरीवाल्याइतके पैसे आताच कमावतो, असे उत्तर दिले. या सर्वेक्षणात शिक्षकांना अनेक नवनवीन अनुभव पाहावयास मिळतात.  ग्रामीण भागातील पालकांच्या प्रश्नांचे उत्तर देतांना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडतेय.

कोरोनामुळे लांबली मोहीमशाळाबाह्य मुलांसाठी विशेष शोध मोहीम १ ते १० मार्च २०२१ या कालावधीत राबविण्यात येणार होती. परंतु कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर करण्यात यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. 

शाळाबाह्य असलेल्या सर्वच मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी जिल्ह्यात ही मोहीम राबविण्यात येत आहे. १०० टक्के विद्यार्थी शाळेत आणण्यासाठी सर्व शिक्षण विभाग युद्धपातळीवर काम करीत आहे.                                  

  - सचिन जगताप,  प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाSchoolशाळाStudentविद्यार्थी