जखमी सापावर शस्त्रक्रिया, १२ टाके पडूनही सुखरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:27 IST2020-12-26T04:27:55+5:302020-12-26T04:27:55+5:30
२० दिवस ठेवणार निरीक्षणात सध्या हा साप सुखरूप असून, आणखी २० दिवस त्यास सर्पमित्रांच्या निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. ...

जखमी सापावर शस्त्रक्रिया, १२ टाके पडूनही सुखरूप
२० दिवस ठेवणार निरीक्षणात
सध्या हा साप सुखरूप असून, आणखी २० दिवस त्यास सर्पमित्रांच्या निरीक्षणात ठेवण्यात येणार आहे. तो पूर्णपणे बरा झाला की त्यास पुन्हा जंगलात सोडून देण्यात येणार आहे. वन्यजीव विभागाचे आरएफओ मयूर सुरवशे आणि प्रादेशिक वनविभागाचे आरएफओ गणेश टेकाळे यांनीही यासाठी सहकार्य केले. तसेच वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचे आर. एच. पठाण यांचेही सहकार्य लाभले.
मनका तुटलेल्या सापालाही जीवदान
२०१४ मध्ये राजूर घाटात अंगावरून वाहन गेलेल्या एका सापालाही सर्पमित्रांनी जीवदान दिले होते. पशुसंवर्धन उपायुक्तांच्या दवाखान्यात या सापावर शस्त्रक्रिया करून त्याचा मनका जोडण्यात आला होता. हा प्रयोगही यशस्वी झाला होता. सोबतच अन्य एका सापावरही अशाच पद्धतीने शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान देण्यात आले होते.