दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूंची सुप्रिया सुळे करणार पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:09+5:302021-09-23T04:39:09+5:30

नियोजन मंडळाचे सदस्य तथा शहराचे माजी नगराध्यक्ष ॲड. नाझेर काजी यांनी ९ सप्टेंबर रोजी खा. सुप्रिया सुळे यांची मुंबई ...

Supriya Sule will inspect the neglected historical buildings | दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूंची सुप्रिया सुळे करणार पाहणी

दुर्लक्षित ऐतिहासिक वास्तूंची सुप्रिया सुळे करणार पाहणी

नियोजन मंडळाचे सदस्य तथा शहराचे माजी नगराध्यक्ष ॲड. नाझेर काजी यांनी ९ सप्टेंबर रोजी खा. सुप्रिया सुळे यांची मुंबई येथे भेट घेऊन शहरातील ऐतिहासिक वास्तूंची कशी दुर्दशा झाली याची माहिती दिली. या संदर्भात कार्यवाही करण्याची मागणीही त्यांनी केली होती. पुरातत्त्व विभागाकडून दुर्लक्षित झालेल्या ऐतिहासिक वास्तू पाहण्याची मागणी काझी यांनी केली असता, त्यानुसार खासदार सुळे यांनी शनिवार, २५ सप्टेंबर रोजी शहरात येत आहेत.

याठिकाणी करणार पाहणी

सुप्रिया सुळे व अधिकारी वर्ग सिंदखेड राजा शहरातील राजे लखोजीराव जाधव यांचा वाडा, समाधी, श्री रामेश्वर मंदिर, नीळकंठेश्वर मंदिर, शनी बारव, मोती तलाव, चांदणी तलाव, सजणा बारव, गंगा सागर, बाळसमुद्र या विहारी पुतळा बारव, आदी वास्तूंची पाहणी करणार आहेत.

Web Title: Supriya Sule will inspect the neglected historical buildings