सुप्रिया सुळेंंनी केली १३ ऐतिहासीक स्मारकांची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:37 IST2021-09-26T04:37:47+5:302021-09-26T04:37:47+5:30

सिंदखेडराजा: मातृतीर्थ नगरीत एवढे महत्वपूर्ण ऐतिहासिक स्मारक आहेत, याचे आश्चर्य व्यक्त करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी शहरातील स्मारकांची ...

Supriya Sule inspected 13 historical monuments | सुप्रिया सुळेंंनी केली १३ ऐतिहासीक स्मारकांची पाहणी

सुप्रिया सुळेंंनी केली १३ ऐतिहासीक स्मारकांची पाहणी

सिंदखेडराजा: मातृतीर्थ नगरीत एवढे महत्वपूर्ण ऐतिहासिक स्मारक आहेत, याचे आश्चर्य व्यक्त करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी शहरातील स्मारकांची पाहणी केली. प्रत्येक स्मारकाविषयी त्यांनी उत्सुकतेने माहिती विचारली, ऐतिहासिक माहिती समजून घेतली व जिथे सूचना द्याव्या लागतात तिथे यथायोग्य सूचना केल्या. त्यामुळे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर शहरातील स्मारक पाहणीचा कार्यक्रम यशस्वी झाला असे म्हणता येईल़ परंतु येणाऱ्या काळात शहराचा आणि येथील ऐतिहासिक स्मारकांच्या विकास किती शक्य होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पाहणी दौऱ्यात खासदार सुळे यांनी सर्व १३ स्मारकाची अत्यंत बारकाईने पाहणी केली. यावेळी त्यांचेसोबत पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. राममूर्ती, जिल्हा परिषदेच्या सीईओ भाग्यश्री विसपुते यांच्याह केंद्र आणि राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्येक स्मारकाचे महत्व, त्याचा कालावधी समजून घेण्याचा प्रयत्न केला़ नियोजन मंडळाचे सदस्य ॲड. नाझेर काझी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विजय तायडे, संदीप मेहेत्रे यांनी सुळे यांना संपूर्ण स्मारकाची यथोचित माहिती दिली. प्रत्येक स्मारकात गेल्यानतर सुळे यांनी इतिहासात संग्रहित असलेली माहिती आणि पुरातत्व विभागाकडून दिल्या गेलेली माहिती समजून घेतली. आवश्यक त्या ठिकाणी स्मारकाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या़ ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिरात मंदीर ट्रस्टच्यावतीने सुप्रिया सुळे यांचा साडीचोळी देऊन सन्मान करण्यात आला़ रामेश्वर मंदिर ही एक पुरातन वास्तु आहे़ सध्या हे मंदिर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या ताब्यात असल्याने तेथील धार्मिक कार्यक्रम आणि धार्मिक वातावरणावर निर्बंध आहेत़ हे संपूर्ण निर्बंध हटवुन मंदिराचे धार्मिक महत्व कायम ठेवण्याची मागणी यावेळी करण्यात आली तर मंदिराच्या दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्याच्या सूचना यावेळी सुळे यांनी दिल्या़ पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे व अॅड नाझेर काझी यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना समोर बोलावुन मंदिरातील धार्मिक निर्बंध हटविण्याचे सुचविले़

विविध स्मारकांना दिली भेट

या पाहणी कार्यक्रमात मोती तलाव, रामेश्वर मंदिर, राजे लखोजीराव जाधव यांची समाधी, निळकंठेश्वर मंदिर, पुष्करणी बारव, रंग महाल, काळाकोट, सावकार वाडा, नृत्यशाळा, राजवाडा, पुतळा बारव, चांदणी तलाव, सजना बारव आदी ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे आणि अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या

Web Title: Supriya Sule inspected 13 historical monuments