सुप्रिया सुळे १९ जूनला जिल्ह्यात

By Admin | Updated: June 17, 2017 00:15 IST2017-06-17T00:15:08+5:302017-06-17T00:15:08+5:30

बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून आढावा घेण्याकरिता १९ जून रोजी खा.सुप्रिया सुळे बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत.

Supriya Sule district on 19th June | सुप्रिया सुळे १९ जूनला जिल्ह्यात

सुप्रिया सुळे १९ जूनला जिल्ह्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक दृष्टिकोनातून आढावा घेण्याकरिता १९ जून रोजी खा.सुप्रिया सुळे बुलडाणा जिल्ह्यात येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा राष्ट्रवादी कार्यालय मलकापूर रोड येथे नुकतीच जिल्हा विस्तारित कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली.
बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र शिंगणे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी, कार्याध्यक्ष संगीतराव भोंगळ यांच्यासह जिल्ह्यातील विस्तारित कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते. पक्षाच्या संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून आढावा घेण्याकरिता येत असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या कार्यक्रमाची माहिती पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना देण्यात आली असून, १९ जून रोजी खा.सुप्रिया सुळे सकाळी ९ ते १० शहरातील प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करणार आहेत. पुढे शिवसाई ज्यु.कॉलेज येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, मलकापूर रोड येथील जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, दुपारी २ ते ३ जिल्हा कार्यकारिणीची बैठक, ३ ते ६ पर्यंत विविध विभागनिहाय पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा व मार्गदर्शन करणार आहेत. तसेच सायंकाळी ६ ते ७ आयोजित पत्रकार परिषदेस उपस्थित राहणार आहेत. तरी कार्यक्रमाला हजर रहावे, असे आवाहन राष्ट्रवादीने केले आहे.

Web Title: Supriya Sule district on 19th June