जळगाव कृउबासचा संपाला पाठिंबा
By Admin | Updated: June 2, 2017 00:13 IST2017-06-02T00:13:39+5:302017-06-02T00:13:39+5:30
तूर मोजणीसाठी एकही शेतकरी आला नाही

जळगाव कृउबासचा संपाला पाठिंबा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : महाराष्ट्रभर सुरू असलेल्या शेतकरी संपाला जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीनेही पाठिंबा दिला आहे.
पावसाळ्याचे दिवस तोंडावर असताना, १ जून रोजी कृउबासच्या यार्डामध्ये एकही शेतकरी तूर मोजणीसाठी फिरकला नाही. या भागातील शेतकरीही संपावर असल्याचे यावरून दिसून येते.
जळगाव कृउबास यार्डामध्ये मोजणीच्या प्रतीक्षेमध्ये ५० हजार क्विंटल तूर पडलेली आहे. मात्र, आमची तूर मोजा, यासाठी एकही शेतकरी यार्डात आला नाही. त्यामुळे दिवसभर येथे शुकशुकाट जाणवत होता. शेतकरी संपावर जाणे ही फार मोठी दु:खदायक घटना आहे. आता शेतकऱ्यांचा संताप अनावर होत असल्याचे शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या संपावरून दिसून येते. या संपाला जळगाव जामोद कृउबासचा पाठिंबा असल्याचे सभापती प्रसेनजित पाटील यांनी सांगितले.