आठ हजार निराधार लाभार्थ्यांना आधार
By Admin | Updated: May 20, 2014 23:53 IST2014-05-20T23:10:59+5:302014-05-20T23:53:48+5:30
मेहकर : ७५ लाख ३0 हजार रुपयांचा निधी

आठ हजार निराधार लाभार्थ्यांना आधार
मेहकर : तालुक्यातील निराधारांसाठी शासनाच्या संजय गांधी व श्रावण बाळ योजने अंतर्गत ७५ लाख ३0 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीमुळे तालूक्यातील ८ हजार निराधार लाभार्थ्यांना आधार मिळणार आहे. निराधारांसाठी शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येतात. निराधारांना हातभार देण्यासाठी शासन मदत म्हणून काही अनुदानही वाटप करत असते. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, वृद्धापकाळ योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे. तालुक्यात श्रावण बाळ योजनेचे ७ हजार ९७0 लाभार्थी आहेत. तर संजय गांधी योजनेचे २ हजार ९१७ लाभार्थी आहेत. संजय गांधी निराधार योजना आणि ङ्म्रावणबाळ योजनांचे मार्च आणि एप्रिल महिन्याचे ७५ लाख ३0 हजार रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे. या अनुदानाचा तालुक्यातील ७ हजार ९७0 निराधार लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. यामधुन ७५ लाख ३0 हजार रुपये अनुदान हे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. त्या लाभार्थ्यांनी ही रक्कम खात्यावरून काढून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार निर्भय जैन व योजना संबधीत अधिकार पी.जी.राऊत यांनी केले आहे.