१९ वर्षाखालील क्रिकेट संघाची रविवारी निवड चाचणी
By Admin | Updated: September 2, 2015 02:27 IST2015-09-02T02:27:20+5:302015-09-02T02:27:20+5:30
विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूरच्यावतीने निवड चाचणी बुलडाण्यात.

१९ वर्षाखालील क्रिकेट संघाची रविवारी निवड चाचणी
बुलडाणा : शहरी व ग्रामीण भागातील प्रतिभावंत खेळाडूंचा शोध घेण्यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशन नागपूरच्यावतीने १९ वर्षाखालील क्रिकेट संघाची निवड चाचणी रविवार, ६ सप्टेंबर रोजी बुलडाण्यात होत आहे. सहकार विद्या मंदिराच्या क्रिकेट अकादमीत होणार्या या निवड चाचणीसाठी समितीचे अध्यक्ष मो.साबीर, चंद्रकांत साळुंखे, सुरेश बोबडे, पुरूषोत्तम निळे हे खेळाडूंची निवड करणार आहेत. तरी जिल्ह्यातील खेळाडूंनी हजर रहावे, असे आवाहन विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे समन्वयक किशोर वाकोडे यांनी केले आहे. यासाठी कुठल्याही प्रकारची फी नसून खेळाडूंनी राजेश ढाले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.