तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 19:14 IST2017-05-29T19:14:57+5:302017-05-29T19:14:57+5:30
खामगाव : शेगाव तालुक्यातील पाळोदी येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना २७ मे रोजी घडली.

तरुण शेतकऱ्याची विष प्राशन करुन आत्महत्या
ऑनलाइन लोकमत
खामगाव : शेगाव तालुक्यातील पाळोदी येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना २७ मे रोजी घडली. पाळोदी येथील शेतकरी प्रल्हाद बाळकृष्ण भारसाकळे (वय २७) याने २७ मे रोजी विष प्राशन करुन जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकार प्रल्हाद भारसाकळे यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अत्यवस्थ झालेल्या प्रल्हाद भारसाकळे यांना तातडीने उपचारासाठी शेगाव येथील सईबाई मोटे रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अत्यवस्थ असल्याने प्रल्हाद भारसाकळे यांच्यावर प्रथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. मात्र अकोला येथील रुग्णालयात नेण्यापूर्वीच प्रल्हाद भारसाकळे यांची प्राणज्योत मालवली. सदर मृतक शेतकऱ्यावर सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे १ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज थकीत आहे. मृतकाचे पश्चात आई-वडिल, बहिण, भाऊ असा आप्त परिवार आहे.