तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 17:01 IST2019-08-28T17:01:25+5:302019-08-28T17:01:30+5:30
रस्त्यावरील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली.

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
पिंपळगाव सराई : व्याजाच्या पैशासाठी सततच्या तगाद्याला कंटाळून ३२ वर्षीय तरुणाने भारज रस्त्यावरील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी मृताच्या व्याह्याने दिलेल्या फिर्यादीवरुन रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीस बुधवारी सकाळी बुलडाणा येथून अटक केली आहे. धाड येथील गजानन दांडगे यांचा दुचाकीवरुन गावोगावी किरकोळ वस्तूंच्या विक्रीचा व्यवसाय होता. धंद्यासाठी त्यांनी धाड येथील अरविंद कल्याणकर यांच्याकडून व्याजाने १ लाख रुपये घेतले होते. व्याजाची रक्कम त्यांनी परतही केली होती. मात्र तरीही अरविंद कल्याणकर त्यांच्याकडे पैशासाठी सतत तगादा लावत होता. पैसे परत कर नाहीतर घर नावे कर अशी धमकी देऊन मानसिक त्रास देत होता, अशी तक्रार मृताचा व्याही नरेश कटोरे याने रायपूर पोलिस स्टेशनला दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करुन पोलिसांनी बुधवारी सकाळी आरोपी अरविंद कल्याणकर यास बुलडाणा येथून अटक केली आहे. अधिक तपास ठाणेदार सुभाष दुधाळ करीत आहेत.