विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:39 IST2017-08-05T00:38:33+5:302017-08-05T00:39:41+5:30

पिंपळगांव सैलानी : सातगाव भुसारी येथील केसरबाई साहेबराव गाढे (वय ४५ ) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजेच्यादरम्यान उघडकीस आली.

Suicide of a woman by taking a plunge in the well | विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

विहिरीत उडी घेऊन महिलेची आत्महत्या

ठळक मुद्देसातगाव भुसारी येथील घटनारायपूर पोलीस स्टेशनला दिली घटनेची फिर्याद

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपळगांव सैलानी : सातगाव भुसारी येथील केसरबाई साहेबराव गाढे (वय ४५ ) या महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ४ ऑगस्ट रोजी सकाळी १0 वाजेच्यादरम्यान उघडकीस आली.
या घटनेची फिर्याद ज्ञानेश्‍वर हिमतराव गाढे यांनी रायपूर पोलीस स्टेशनला दिली. यावरुन ठाणेदार जे.एन. सैयद यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.आय. किशोर चिंचोले, विश्‍वास हिवाळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता सदर मृतक महिलेने गावाच्या बाहेर पंचफुलाबाई एकनाथ ठेंग यांच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या      केली होती. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. 

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अमडापूर : मंगळरुळ नवघरे येथे २४ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३ ऑगस्ट रोजी रात्री ८.३0 वाजता घडली. मंगरुळ नवघरे येथील राजेश रमेश काकडे (२४) याने स्वत: च्या राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यासंदर्भात उमेश सुरेश काकडे यांनी अमडापूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी कलम १७४ जा.फो नुसार मृत्यूची नोंद केली आहे. 

Web Title: Suicide of a woman by taking a plunge in the well