तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: May 18, 2017 00:40 IST2017-05-18T00:40:09+5:302017-05-18T00:40:09+5:30
जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम आसलगाव येथील प्रवीण गजानन करणकार (वय २४) या तरुणाने कडूनिंबाचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ मे च्या रात्री घडली.

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : तालुक्यातील ग्राम आसलगाव येथील प्रवीण गजानन करणकार (वय २४) या तरुणाने कडूनिंबाचे झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १६ मे च्या रात्री ११.३० वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत फिर्यादी प्रमोद गजानन करणकार रा.आसलगाव यांनी जळगाव पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम १७४ जा.फौ.नुसार मर्ग दाखल केला आहे. सदर तरूणाकडे शेती असून, सततच्या नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे, तर याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारी हे करीत आहेत.