नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: October 2, 2014 23:29 IST2014-10-02T23:29:58+5:302014-10-02T23:29:58+5:30

राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या.

Suicide by taking robbery of a newly married woman | नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपळगाव काळे (बुलडाणा) : नवविवाहितेने राहत्या घरी पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविली. ही घटना आज येथील शिव नगर परिसरात सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली.
भांबेरी ता.तेल्हारा येथील संजय कळमकार यांची मुलगी पूजाचा विवाह पाच महिन्याआधी येथील समाधान पुंजाजी अंबुस्कर यांच्या मुलासोबत झाला होता. दरम्यान, आज २ ऑक्टोबर रोजी पूजा हिचे सासू, सासरे व पती शेतात कामाला गेले असता घरी कोणी नसल्याचे पाहून पूजा अंबुस्कर हिने राहत्या घरातील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. पूजाचा दीर मोहन हा गावातील हेअर कटींग सलुनचे काम आटोपून घरी आला असता, ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Suicide by taking robbery of a newly married woman