युवतीची गळफास घेऊन आत्महत्त्या
By Admin | Updated: June 24, 2017 18:04 IST2017-06-24T18:04:12+5:302017-06-24T18:04:12+5:30
आडगाव ग्रामीण पोलीस वसाहतीत राहणाऱ्या महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना घडली़

युवतीची गळफास घेऊन आत्महत्त्या
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : आडगाव ग्रामीण पोलीस वसाहतीत राहणाऱ्या महाविद्यालयीन युवतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याची घटना शुक्रवारी (दि़२३) सकाळच्या सुमारास घडली़ पूजा मारुती मेमाणे (१९ रा.रू.न.१० पोलीस मुख्यालय नाशिक ग्रामीण) असे आत्महत्त्या केलेल्या युवतीचे नाव आहे़
आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी पूजाने घरातील स्वयंपाकगृहात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला़ ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला मविप्रच्या आडगाव वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले़
दरम्यान, आत्महत्त्येचे कारण समजू शकले नसून आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.