नववधूची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: June 25, 2017 09:25 IST2017-06-25T09:25:04+5:302017-06-25T09:25:04+5:30
१८ वर्षीय नववधूने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना

नववधूची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली: लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच सासरी नांदायला गेलेल्या १८ वर्षीय नववधूने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ जूनच्या रात्री साडेतीन वाजेच्या सुमारास तालुक्यातील रोहडा येथे घडली आहे. आत्महत्या केलेल्या नववधूचे नाव भाग्यश्री रामेश्वर तळेकर आहे. रोहडा येथील रहिवासी संजय तेजराव बुरुकुल यांची मुलगी भाग्यश्री हिचा विवाह गावातीलच रामेश्वर तळेकर या युवकाशी २३ मे रोजी पार पडला होता. सासरकडील मंडळी भाग्यश्रीला सासरी घेऊन जाण्यासाठी आले होते व त्यांच्यासोबत भाग्यश्री सासरी गेली होती; मात्र सासरी गेल्यानंतर रात्रीच्या वेळी सर्व जण झोपेत असताना घरातून कोणाला काहीही न सांगता भाग्यश्री घरातून निघून गेली. पहाटे भाग्यश्रीचा मृतदेह दिसून आला.