सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

By Admin | Updated: February 14, 2015 01:45 IST2015-02-14T01:45:37+5:302015-02-14T01:45:37+5:30

मेहकर तालुक्यातील घटना.

Suicide Suffering Suffer Suffering | सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या

डोणगाव (जि. बुलडाणा) : मेहकर तालुक्यातील नागापूर येथे विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नागापूर येथील संध्या संदीप खिल्लारे (२५) हिला तिचा पती संदीप व सासू-सासरे हुंड्याच्या कारणावरून वारंवार त्रास देत होते. संध्या माहेरवरून पैसे आणत नसल्याने तिला मारहाणही केली जायची. सासरकडील मंडळीकडून शारीरिक व मानसिक त्रास विकोपाला जात असल्याने या त्रासाला कंटाळून संध्याने स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतक संध्याचे काका खुशालराव नामदेवराव वाघ रा. शिवणीपिसा, ता. लोणार यांनी डोणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी संदीप यादवराव खिल्लारे, यादवराव लक्ष्मण खिल्लारे, राधा यादवराव खिल्लारे व इतर तीन जणांविरुद्ध कलम ३0४ ब, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार डी.एम.घुगे, पोहेकाँ शरद बाठे हे करीत आहेत.

Web Title: Suicide Suffering Suffer Suffering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.