दुसरबीड येथील युवकाची आत्महत्या
By संदीप वानखेडे | Updated: May 17, 2023 18:03 IST2023-05-17T18:02:57+5:302023-05-17T18:03:00+5:30
आत्महत्येचे कारण अस्पष्ट

दुसरबीड येथील युवकाची आत्महत्या
दुसरबीड : येथील १९ वर्षीय युवकाने वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली़ ही घटना १७ मे राेजी उघडकीस आली़ संभाजी काकाजी खरात असे मृत युवकाचे नाव आहे़.
दुसरबीड येथील बाजार गल्लीमध्ये राहत असलेला संभाजी खरात हा १६ मे राेजी रात्री ११ वाजता मित्रांबराेबर गप्पा करीत हाेता़ त्यानंतर रात्री उशिरा घरी परतला़ दुसऱ्या दिवशी सकाळी ताे वडाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याविषयी किनगाव राजा पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पाेलिसांनी दुसरबीड येथे धाव घेत पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरता सिंदखेडराजा येथे पाठवले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी वृत्त लिहीस्ताेवर किनगाव राजा पाेलिसात कुठलीही नाेंद घेण्यात आली नव्हती.