ब्रह्मपुरी येथील उद्योजकाची आत्महत्या; मंदिरालगत डोंगरात गळफास घेतला
By भगवान वानखेडे | Updated: April 5, 2023 17:59 IST2023-04-05T17:59:28+5:302023-04-05T17:59:55+5:30
चिखली तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेले अरुण नागोराव अंभोरे हे उद्योजक होते.

ब्रह्मपुरी येथील उद्योजकाची आत्महत्या; मंदिरालगत डोंगरात गळफास घेतला
बुलढाणा - चिखली तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील एका उद्योजकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ५ एप्रिल रोजी सकाळी येथील बालाजी मंदिरामागील राजुर घाटात उघडकीस आली. अरुण नागोराव अंभोरे (५०) असे आत्महत्या केलेल्या उद्योजकाचे नाव आहे.
चिखली तालुक्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी असलेले अरुण नागोराव अंभोरे हे उद्योजक होते. त्यांनी ५ एप्रिल रोजी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. राजुर घाटातील बालाजी मंदिरालगत असलेल्या डोंगरात त्यांनी गळफास घेतला. अरुण अंभोरे यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.