बुलढाणा अर्बन बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या
By संदीप वानखेडे | Updated: May 14, 2023 17:36 IST2023-05-14T17:35:02+5:302023-05-14T17:36:05+5:30
चार वर्षांपूर्वी सांगळे यांच्या पत्नीचे निधन झाले हाेते. त्यांनी दुसरे लग्न केले असून काैटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

बुलढाणा अर्बन बॅंकेच्या शाखा व्यवस्थापकाची आत्महत्या
राहेरी बु.(बुलढाणा) : दुसरबीड येथील बुलढाणा अर्बनच्या दुसरबीड शाखेचे व्यवस्थापक अनिल धोंडोजी सांगळे (वय ५०, रा. जागदरी) यांनी १४ मे राेजी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पाेलिसांनी आकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे.
बुलढाणा अर्बनच्या दुसरबीड शाखेचे व्यवस्थापक अनिल सांगळे हे रविवारी सुटी असल्याने जागदरी येथे आले हाेते. रविवारी सकाळी गावात फिरून आल्यानंतर ते शेतात गेले. बराच वेळ झाल्यानंतर ते परत न आल्याने त्यांचा मुलगा त्यांना शाेधण्यासाठी शेतात गेला हाेता. यावेळी अनिल सांगळे यांनी शेतातील फार्महाउसमध्ये गळफास घेतल्याचे मुलाला दिसले.
चार वर्षांपूर्वी सांगळे यांच्या पत्नीचे निधन झाले हाेते. त्यांनी दुसरे लग्न केले असून काैटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. घटनास्थळी दुय्यम ठाणेदार गजानन मुंडे, पोलिस हेड कॉन्स्टेबल रामदास वैराळ यांनी भेट देऊन पंचनामा केला.