सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:22 IST2021-07-05T04:22:02+5:302021-07-05T04:22:02+5:30
देऊळगावराजा : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ४ जुलै राेजी कुंभारी येथे घडली़ छाया गणेश म्हस्के ...

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
देऊळगावराजा : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना ४ जुलै राेजी कुंभारी येथे घडली़ छाया गणेश म्हस्के असे मृत विवाहितेचे नाव आहे़ या प्रकरणी देऊळगावराजा पाेलिसांनी सासरच्या तीन आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़
छाया हिचे लग्न ग्राम कुंभारी येथील गणेश एकनाथ म्हस्के याच्यासोबत एक वर्षापूर्वी झाले होते़ विवाहितेला घरकाम येत नाही व स्वयंपाक करता येत नाही या कारणावरून सासू ,सासरा व पती हे नेहमी तिला शारीरिक व मानसिक त्रास देत होते़ या त्रासाला कंटाळून ४ जुलै रोजी छायाने आपल्या राहत्या घरी दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली़ या प्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देऊळगाव राजा पोलिसांनी पती गणेश एकनाथ म्हस्के, सासरा एकनाथ म्हस्के व सासू नंदा एकनाथ म्हस्के यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप
सोनुने तथा पोलीस नाईक शिवाजी बिलगे करीत आहेत़