नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या
By Admin | Updated: April 7, 2017 22:36 IST2017-04-07T22:36:22+5:302017-04-07T22:36:22+5:30
खामगाव- नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पहुरजीरा येथे ७ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

नवविवाहितेची गळफास लावून आत्महत्या
खामगाव : नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पहुरजीरा येथे ७ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
पहुरजीरा ता.शेगाव येथील सौ.वैशाली सहदेव पारस्कार (वय २०) या नवविवाहितेने राहत्या घरातील छताच्या अॅगलला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याचे ७ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आले. याप्रकरणी मृतकचा जेठ महादेव पारस्कार यांनी जलंब पोलिस स्टेशनला माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन कलम १७४ जाफौनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. निंभोरा ता.जळगाव जामोद माहेर असलेल्या या नवविवाहितेचे लग्न दीड महिन्यापूर्वीच पहुरजीरा येथील सहदेव पारस्कार यांच्याशी झाले होते.