युवतीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By Admin | Updated: April 28, 2017 00:12 IST2017-04-28T00:12:05+5:302017-04-28T00:12:05+5:30
किनगावजट्टू : किनगावजट्टूपासून जवळच असलेल्या आईचा तांडा येथील युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन युवकांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

युवतीची आत्महत्या; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
किनगावजट्टू : बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या किनगावजट्टूपासून जवळच असलेल्या आईचा तांडा येथील युवतीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी बिबी पोलिसांनी दोन युवकांविरुद्ध २७ एप्रिल रोजी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
किनगाव जट्टूपासून जवळच असलेल्या आईचा तांडा येथील युवती २५ एप्रिल रोजी घरातून बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी २६ एप्रिल रोजी तिचा मृतदेह वस्तीला लागून असलेल्या सार्वजनिक विहिरीत आढळून आला.
यासंदर्भात पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. २७ एप्रिल रोजी सदर युवतीच्या आईने पोलीस स्टेशनला तक्रार देऊन माझ्या मुलीवर सावरगाव तेली येथील अविनाश जग्गाराव राठोड व दीपखेड येथील सुचित गणेश राठोड या युवकांनी माझ्या मुलीला जबरदस्तीने गाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला व घरी सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे बदनामीच्या धाकामुळे माझ्या मुलीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणीचे ६ मे रोजी लग्न ठरले होते. लग्नाच्या काही दिवस आधीच ही घटना घडल्याने कुटुंब हादरले आहे.
आईच्या तक्रारीवरुन बिबी पोलिसांनी दोन्ही युवकांविरुद्ध कलम ३७६, ३०६, ३५४, ५०६, १०९, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. आरोपी फरार असून, पुढील तपास ठाणेदार उबाळे करीत आहेत.
--