वर्दडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:05 IST2021-03-04T05:05:58+5:302021-03-04T05:05:58+5:30
वर्दडी बुद येथील शेतकरी विष्णू तुकाराम साळवे यांच्या आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बॅंकेचे ...

वर्दडी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
वर्दडी बुद येथील शेतकरी विष्णू तुकाराम साळवे यांच्या आईच्या नावाने साडेचार एकर जमीन आहे. मात्र सततची नापिकी, बॅंकेचे कर्ज, मुलीच्या लग्नातील काही खासगी कर्ज यामुळे ते काही दिवसांपासून चिंताग्रस्त हाेते. यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी ०१ मार्च रोजी विषारी औषध प्राशन केले. याविषयी नातेवाईकांना माहिती मिळताच त्यांना तातडीने सिंदखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून त्यांना जालना येथे दाखल करण्यात आले हाेते. प्रकृती बिघडल्याने त्यांना औरंगाबाद येथे घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. मात्र उपचारादरम्यान ०२ मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई ,एक भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, असा आप्त परिवार आहे.