कर्जबाजारीपणामुळे इसमाची आत्महत्या
By Admin | Updated: July 18, 2016 23:43 IST2016-07-18T23:43:50+5:302016-07-18T23:43:50+5:30
मोताळा तालुक्यातील घटना.

कर्जबाजारीपणामुळे इसमाची आत्महत्या
मोताळा (जि. बुलडाणा): शहरालगतच्या सांगळद येथील ६२ वर्षीय इसमाने कर्जाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली. अशोक नवृत्ती भारंबे (वय ६२) ग्रा.पं. सदस्य रा. सांगळद यांनी सुरेंद्र ङ्म्रीराम पाटील रा.बोराखेडी यांच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. अशोक नवृत्ती भारंबे हे भूमिहीन असून, मोताळा फाट्यावर सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करीत होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी व्यवसायातून मिळणारे उत्पन्न तोकडे पडत असल्याने ते कर्जबाजारी झाले होते. कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत अशोक भारंबे यांनी सुरेंद्र पाटील यांच्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या खिशामध्ये मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख असल्याचे पोलिसांनी सांगितले.