पत्नीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 20:23 IST2017-10-09T20:22:29+5:302017-10-09T20:23:20+5:30

अमडापूर : पत्नीच्या डोक्यावर दगड घालून हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न  घटना चिखली तालुक्यातील पिंपरखेड येथील रविवारी रात्री घडली.  

Suicide attempt by killing a wife | पत्नीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न  

पत्नीची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न  

ठळक मुद्देपिंपरखेड येथील घटनापत्नीच्या डोक्यावर दगड घालून हत्या 

लोकमत न्यूज नेटवर्क
अमडापूर : पत्नीच्या डोक्यावर दगड घालून हत्या केल्यानंतर पतीने आत्महत्येचा प्रयत्न  घटना चिखली तालुक्यातील पिंपरखेड येथील रविवारी रात्री घडली.  
अमडापूर येथून जवळच असलेल्या चिखली तालुक्यातील पिंपरखेड येथील केशव सिताराम गायकी पत्नी गोदावरी व दोन मुली व एका मुलासह गावात वास्तव्यास आहेत. त्यांच्या घरामध्ये नेहमीच किरकोळ वाद होत असल्याचे आजूबाजूच्या काही लोकांनी बघीतले. ८ आॅक्टोबर रोजीच्या मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास केशव सिताराम गायकी (वय ४० वर्षे) दारूचे नशेत घरी पिंपरखेड येथे आला. घरामध्ये पत्नी गोदावरी (वय २५) ही झोपली होती. त्यावेळी त्याने पत्नीच्या डोक्यावर अंदाजे दगड मारला. त्यावेळी मुलगी संजीवनी हिने आरडा-ओरड केल्याने शेजाºयांनी घरात धाव घेतली व गोदावरी हिला औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर केशवने विषारी औषध प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यालाही शेजारच्यांनी चिखली येथे उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती ठाणेदार विक्रांत पाटील यांना मिळताच त्यांनी पीएस.आय. उमेश भोसले, पोहेकॉ शब्बीर पटेल, विजय बेंडवाल, पो.ना.संजय नागवे, निलेश वाकळे हे घटनास्थळी पोहोचले.  

Web Title: Suicide attempt by killing a wife