आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत!
By Admin | Updated: September 25, 2015 00:08 IST2015-09-25T00:08:40+5:302015-09-25T00:08:40+5:30
चंदनशेष मंडळाच्या पुढाकाराने ग्रामस्थांना आत्महत्या न करण्याची शपथ.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत!
खामगाव : श्री चंदनशेष गणेशोत्सव मंडळाने यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यानुसार तालुक्यातील चिखली येथे व शेगाव तालुक्यातील भोनगाव येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी दहा हजाराची मदत माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांच्याहस्ते देण्यात आली. यावेळी शेतकरी बांधवांनी न डगमगता या संकटाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोठय़ा धैर्याने सामोरे जावे, असे आवाहन माजी आ.दिलीपकुमार सानंदा यांनी केले. श्री चंदनशेष गणेशोत्सव मंडळातर्फे २४ सप्टेंबर रोजी भोनगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व.रामेश्वर त्र्यंबक रताळे व चिखली बु. स्व. रामराव जानराव मानकर यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १0 हजार रुपयांची मदत करण्यात आली. यावेळी खामगाव कृउबास सभापती संतोष टाले, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विजय काटोले, जि.प. सदस्य श्रीकृष्ण धोटे, नगरसेवक अँड.मंदीपसिंग शिख, शांताराम करांगळे, श्री चंदनशेष गणेशोत्सव मंळाचे अध्यक्ष शशिकांत इंगळे उपस्थित होते. यावेळी दिलीपकुमार सानंदा यांनी मानकर कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना धीर दिला. त्यानंतर शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका, अशी शपथ देण्यात आली. यावेळी दिलीप जाधव, अमर पिंपळेकर, दिनेश गावंडे, किशोर जाधव, मनोज खोंड, सोनु जाधव, पिंटु रिंढे, भूषण शिंदे, मदन गावंडे, सत्तु शर्मा, श्रीकृष्ण ताठे, गजानन ठाकरे, विनोद कडुकार, मोहन ताठे, बळीराम सोनोने आदी उपस्थित होते.