सासरच्या मंडळीकडून जावयास मारहाण
By Admin | Updated: November 24, 2015 01:25 IST2015-11-24T01:25:02+5:302015-11-24T01:25:02+5:30
परस्पर तक्रारींवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.

सासरच्या मंडळीकडून जावयास मारहाण
खामगाव : माहेरी असलेल्या पत्नीस घेण्यासाठी गेलेल्या जावयास पत्नीच्या नातेवाइकांनी संगनमत करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील अटाळी येथे घडली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी परस्पर तक्रारींवरून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत प्रफुल्ल इंगळे (वय ३0) रा.वसाडी ता. नांदुरा याने ग्रामीण पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्हटले की, वडील उदयभान इंगळे हे रविवारी अटाळी येथे आईला घेण्यासाठी गेले असता राजू गव्हांदे, सारंग गव्हांदे व रघुनाथ गव्हांदे यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व मारहाण केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला, तर सारंग गव्हांदे (वय ४५) यांनी फिर्याद दिली की, उदयभान इंगळे यांनी रविवारी घरी येवून मुलास जीवे मारण्याची धमकी दिली. समजवण्यास गेलो असता मला तोंडावर बुक्का मारला व डोक्यात दगड मारून जखमी केले. यावरून उदयभान इंगळे विरुद्ध गुन्हा दाखल केला.